जवळ जवळ वर्षभर ब्लॉग लिहिला... तोही इंग्लिश मधून... मग वाटले, मराठी मध्ये का लिहू नये?
...म्हणून हा छोटासा प्रयत्न... मराठीतून लिहिण्याचा... Transliteration वापरताना थोडासा त्रास होतोय खरा, पण बहुतेक जमेल असं वाटतंय...
'माय मराठी' असं नाव देण्यामागे 'चला लिहूया मराठी भाषेची कौतुके' असा काही भाव नसून, 'मला मराठीत लिहावेसे का वाटले' हे सांगण्याचा प्रामाणिक हेतु होता... आणि कौतुक आहे ते गूगल चं... की त्यांनी मराठीत लिहिण्याची सोय उपलब्ध करून दिली ...
तसे बर्याच लोकांचे मराठी ब्लॉग मी वाचले आहेत... आणि वाचत राहीन... पण मराठीत लिहिण्याची मजा काही वेगळीच...... आता जमेल तसं मराठीत लिहित जाईन... बघुया कसं काय जमतंय ते...